संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथी स्मुर्ती दिनानिमित्त अभिवादन करताना बहुजन समाज पार्टी चे शहर उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे
जत/प्रतिनिधी:
येथील हराले समाज बांधवांच्या वतीने जत येथील शिवाजी पेठेतील विठ्ठल मंदिरातील समाज मंदिरात पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्याचबरोबर गणपती मंदिराजवळ ही पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वगुरू संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी जत शहरात साजरी करण्यात आली. पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करताना रावसाहेब यादव, श्रीकांत सोनवणे, विठ्ठल ऐनापुरे, सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार, विठ्ठल पाटील, शशिकांत शिनगारे, संतोष बाबर, नितीन बाबर, स्वप्नील ऐदाळे उपस्थित होते.
..........................
शशिकांत हेगडे (जत)
मो.9011019031
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा