आधुनिक भारतात दलित वस्तीला "शील" ठोकलंय!

आधुनिक भारतात दलित वस्तीला "शील" ठोकलंय!
#लाडेगाव, ता. केज, जि. बीड येथील हा जातीयवादी प्रकार आहे. दलित वस्तीला प्रशासनाने थेट शील ठोकले आहे. 20 वर्षांपासून लाडेगाव येथील गायरान जमीन बौद्ध कसत आहेत ग्रामपंचायतने ठराव करून वनिकरणाच्या नावाखाली जमीन बळकवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
त्यासाठी ग्रामपंचायतने दलित वस्तीलाच शील लावलं आहे. सगळे रस्ते अशाप्रकारे बंद केले आहेत. हे आधुनिक डिटेनशेन कॅम्प आहे का? या भारतात आम्ही गुलामगिरीचे जीणं कितिकाळ जगायचं? आम्ही स्वतंत्र भारतातले वंचित किती असं कैदी जीवन जगायचं? आमच्या सामाजिक आर्थिक उन्नतीचा येते अजेंडा का नाही? थोडा हात पाय मारलाच सगळी व्यवस्था आम्हाला कैद करायला निघते. गुलाम करायला निघते.
बीड जिल्ह्यात सर्वात मोठा गायरान जमिनीचा प्रश्न पुढे आला आहे. कित्येक दलित अत्याचार हे गायरान जमिनिवरूनच झाले आहेत, या ज्वलंत प्रश्नांकडे कुणाचेच लक्ष नाही. सगळे सत्तेच्या मस्तीत मग्न आहेत. बीड जिल्ह्याचे धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यात समाजावर अन्याय सुरू आहे. 
गायरान जमीन हा आमचा जुना प्रश्न नव्याने लढण्याची वेळ आलेली आहे. दादासाहेब सबलीकरण योजनेच्या माध्यमातून आम्ही जमिनी देतो म्हणून सांगितलं जातं, त्या जमिनी तर दिल्या जात नाहीत परंतु ज्या गायरान आम्ही कसतो त्याच हिसकावून घेतल्या जात आहेत. 
घाडेगाव हे गाव बंदिस्त करण्यात आले आहे हा हुकूमशाही उस्मानी फतवा ज्यानी काढला त्या ग्रामपंचायत सदस्यांवर, तहसीलदार, जिल्हा अधिकारी यांच्यावर अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत कार्यवाही झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक अन्यायमंत्री झाले आहेत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!
आधुनिक जातीयतेच्या विरोधात नवा संघर्ष उभा करावा लागेल. बीड जिल्ह्यासहित महाराष्ट्राचा हा मुद्धा झाला असून लवकर या प्रश्नांकडे सरकारने गंभीरतेने पाहिले नाही तर राज्यभर आंदोलन छेडणार आहोत!

- दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष
ऑल इंडिया पँथर सेना
#AllindiaPantherSena

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule