सरपंच धनाजी पाटील यांचा दणदणीत विजय आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते सरपंच धनाजी पाटील यांचा सत्कार
जत/प्रतिनिधी:
रेवनाळ ता जत येथील ग्रामपंचायत विद्यमान सरपंच धनाजी पाटील यांचा अविश्वास ठरावावर विजय मिळवल्या बद्दल काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार..
जत तालुक्यातील रेवनाळ ग्रामपंचायतची निवडणूक 2017 मध्ये झाली त्यावेळी धनाजी पाटील हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड आले होते त्यांच्या बरोबर 4 सदस्य त्यांच्या गटाचे निवडून आले गावाचा कारभार चांगला चालला असतांना गावातील भाजपा व राष्ट्रवादी नेत्यांनी सदर लोकनियुक्त सरपंचावर सरपंचाच्या गटातील सदस्य फोडून अविश्वास ठराव डिसेंबर 2020 मध्ये पारित केला सदर ठराव जिल्हा अधिकारी यांच्या कडे पाठवण्यात आला त्यावर मा.जिल्हाधिकारी यांनी परत लोकनियुक्त सरपंचाचा पदावर रहाणे अगर नरहाने यांचा फैसला गावातील जनतेने करावा असे आदेश दिले त्या प्रमाणे दि.1 जानेवारी 2021 ला निवडणूक घेण्यात आली लोकांनी मतदान केले त्या मध्ये परत विद्यमान सरपंच धनाजी पाटील 16 मतांनी आघाडी घेऊन निवडून आले या वरून जनता विरोधकांचे मनसुबा हणून पाडला गावातील आजी माजी जि.प.पं.स.सदस्य विद्यमान ग्रामपंचायत 9 सदस्य असे मातबर नेते असताना राष्ट्रीय काँग्रेस च्या कार्यकर्त्यानी मोठी ताकत लावून सदर विद्यमान सरपंचांना पुन्हा पदावर बसवले यात काँग्रेस ची ताकत जनतेने दाखवून दिले यामुळे तालुक्यातील होणाऱ्या चालू ग्रामपंचायत निवडणूकिवर याचं चांगला परिणाम होणार निवडून आल्यानंतर सरपंच धनाजी पाटील यांचा जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मा.आमदार विक्रम दादा सावंत व जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिराजदार,माजी पं स सभापती बाबासाहेब तात्या कोडग यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी गावातील काँग्रेस कार्यकर्त्यानी जल्लोष केला.
उपसंपादक
शशिकांत हेगडे
मो.9011019031
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा