माडग्याळ येथे उमदी पोलीस चे नाकाबंदी ; दंडात्मक कारवाई

 
माडग्याळ  /  प्रतिनिधी 
माडग्याळ येथे नाकाबंदी करून  उमदी पोलिसांनी जोरदार दंडात्मक कारवाई करण्यात आली  . 
 कोरोनाच्या पाश्चूभूमीवर उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर , निरीक्षक नामदेव दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माडग्याळ येथे 25  विनामास्क वाहनधारकांडून 12, 500 रूपये रोखीने दंड वसूल करण्यात आला  . 
यावेळी ही कारवाई उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर , निरीक्षक नामदेव दांडगे , एस.बी वळसंगकर , राम बनैनवर , विंक्रम घोदे , पोलीस सिध्देश्वर मोरे ,   आदीनी कारवाई केली . 
तसेच  रस्त्यावर विनाकारण  फिरणाऱ्या  वाहनधारकांडून लोकांची कोरोना चाचणी  करण्यात आली .  यामध्ये  23  तरुणांचे  रॅपिड अँटीजन टेस्ट  घेण्यात आले . सर्वांचे  रिपोर्ट  निगेटिव्ह  आले .  रस्त्यावर उमदी पोलीस ठाणे व आरोग्य केंद्र यांच्या वतीने राबवलेल्या  या मोहिममुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारक  भिती निर्माण झाली . 
माडग्याळ येथे मुख्य रस्ता लगत आरोग्य विभागाने व उमदी पोलीस ठाणे यांनी थांबून रस्त्यावर लोकांची तपासणी केली .  
उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक  निरीक्षक दत्तात्रय कोळेकर , निरीक्षक नामदेव दांडगे ,  यांनी  व त्यांचे सहकारी तसेच आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule