तालुका पातळीवरील सर्व घटक प्रमुखांनी समन्वय ठेवून काम करावे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांचे आवाहन
जत:
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जत तालुक्याला भेट देऊन सर्व खात्याचे प्रमुख यांची बैठक घेतली.
जिल्हापातळीवर ज्याप्रमाणे मा.जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी ,महानगरपालिका आयुक्त यांची यांचेत समन्वय आहे, तशाच प्रकारे तालुका पातळीवर देखील सर्व घटक प्रमुखांनी समन्वय ठेवून काम केल्यास प्रभावी काम होईल व लवकरच कोविड या संसर्गजन्य आजाराचां प्रसार रोखू शकू.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी यावेळी जिल्हाबंदी चे चेक पोस्ट कंटेनमेंट झोन कोविड केअर सेंटर, लसीकरण केंद्रे हॉटस्पॉट इत्यादी बाबत आढावा घेतला. तसेच नागरिकांना नियमांचे पालन करणे बाबत आवाहन केले. कोणीही विनाकारण घरा बाहेर पडणार नाही, मास्क सामाजिक आंतर इत्यादीचा काटेकोरपणे अवलंब करतील तसेच जे रुग्ण ग्रह विलगीकरण आत आहेत ते बाहेर फिरणार नाहीत,लक्षणे आढळून येताच नागरिकांनी त्वरित तपासणी करून घ्यावी व लवकर औषध उपचाराला सुरुवात करावी जेणेकरून प्राथमिक अवस्थेतच तो आजार बरा करता येईल बाबतचे आवाहन केले आहे.
या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटी,उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, तहसीलदार हणमंत म्हेत्रे, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, तालुका आरोग्य अधिकारी बंडगर, गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,नगरपरिषदेचे अधिकारी हजर होते.
शशिकांत हेगडे
9011019031
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा