जत तालुक्यात वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू यामध्ये २ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान

 

जत:
जत तालुक्यातील गोंधळवाडी,लकडेवाडी,जाडरबोबलाद येथे वीज पडून तीन जनावरे मृत्यू झाला.यामध्ये २ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाले.नुकसानीचा पंचनामा केला आहे. 
तालुक्यात सोमवारी विजेचा कडकडाट, ढगांच्या गडगडासह दुपारी ४ नंतर अचानक ढगांची दाटी झाली.काल रात्रभर झालेल्या वळीव पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गोंधळेवाडी येथील शेतकरी निल्लव्वा मायप्पा पांढरे यांंच्या म्हैसीवर वीज पडून मृत्यू झाला. ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.
जाडरबोबलाद येथील शेतकरी परशुराम शिवप्पा ऐनापुरे यांची गायचा मृत्यू झाला.७० हजार रुपयांचे नुकसान झाले. लकडेवाडी येथील शिवाजी सुखदेव लकडे यांची गाय वीज पडून मृत्यू झाला.६५ हजार रुपयेचे नुकसान झाले.  
   
गोंधळेवाडी ,जाडरबोबलाद ,लकडेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा केला.जाडरबोबलादचे तलाठी विनायक बालटे,लकडेवाडीचे नितीन कुंभार,संखचे राजेश चाचे,गणेश पवार ,राहूल कोळी  यांनी पंचनामा केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule