परशुराम मोरे यांचे काम उत्कृष्ट इतरांनी प्रेरणा घेण्यासारखे - खा. संजय काका पाटील


जत:
जत शहरात जागर फाऊंडेशन च्या माध्यमातून परशुराम मोरे यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वखर्चाने ट्रॅक्टर मधून सॅनिटाइझर फवारणीचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय (काका) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी आमदार विक्रम सावंत,पोलिस निरीक्षक उत्तम जाधव,रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,जि प सदस्य सरदार पाटील, महादेव पाटील, काँग्रेस चे तालुकाध्यक्ष आप्पाराय बिरादार,बाबासाहेब कोडग,मारुती पवार,जागर फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे,विक्रम ढोणे,आकाश बनसोडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा संजय काका पाटील म्हणाले, परशुराम मोरे यांच्या काम अतिशय चांगल आहे.आपल्याला मिळालेलं आयुष्य हे दुसऱ्याच्याही कामी यावं त्याच्या उपयोगी पडाव ह्या भावनेतून ते समाजाचा चांगला प्रश्न घेऊन काम करत आहेत.परशुराम मोरे यांच्या आदर्श आणि प्रेरणा घेऊन ह्या कोरोना महामारीच्या संकटातून कस बाहेर येता येईल ह्यासाठी सामाजिक संस्था,ट्रस्ट ह्या सर्वांनी एक जुटीनं प्रयत्न केले पाहिजेत. 

यावेळी आ विक्रम सावंत म्हणाले,
परशुराम मोरे हे पहिल्यापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.सर्वसामान्य लोकांसाठी आपल्या परीने काय देऊ शकतो ही भावना ठेऊन काम करत आहेत. ह्याच पद्धतीने तालुक्यातील इतर संस्था नी काम करावं 

यावेळी जागर फाऊंडेशन ची संपूर्ण टीम उपस्थित होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule