वृक्ष संवर्धन काळाची गरज - सचिन झेंडे
अगदी लहान असताना पासून ऐकत आलो आहेत कि वृक्ष संवर्धन केले पाहिजे , पण करणार कोण? बऱ्यापैकी अनेकांनी या विषयावर निबंधही लिहिले असतील पण एक झाड अख्या आयुष्यात लावले नसतील म्हणण्यापेक्षा लावलीच नाहीत, पण आज परीस्थित अशी आहे कि आपण त्यावेळी फ़क़्त निबंधातून लिहाण्यापेक्ष्या प्रत्येकाने एक - एक झाड लावले असते तर आज पुन्हा नव्याने वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे हे म्हणण्याची वेळ आली नसती. अगदी पहिलीच्या पुस्तकापासून झाड आणि ओक्शिजन यांचे महत्व सांगितले आहे पण आपण याकड सोयीस्कर पणे दुर्लक्ष करत आलो पण आता खरी वेळ आली आहे कि पृथ्वीवर झाडाचे संवर्धन करणे हि काळाची गरज आहे म्हणायची .
आज आख्खा जग कोरोना सारख्या भयाण परिस्थितीतून चालला आहे, पूर्ण जगावर संकट आलय आणि या संकटाने जागतिक महामारी चे रूप धारण केले आहे. सामन्यात: पहिले तर कोरोना झालेल्या पेशंट ला ओक्षिजन (O2) ची गरज भासत असल्याचे आपण पाहत आहोत पण आपले दुर्देव ते ओक्षिजन मिळवण्यासाठी लाखो रु. खर्च करावे लागत आहेत ,आणि तरीही यातून नशिबावर अवलंबून रहाव लागत आहे. आणि याला जबाबदार आपण सर्व आहोत , झाडे लावा झाडे जगवा नुसत्याच घोषणा आपण दिल्या पण एक झाड आपण लावू शकलो नाही , म्हणून आज आपल्याला याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे. अनेक श्वसनाचे आजारानि सर्व जीव श्रुष्टीला घेरले आहे पाउस कमी झाला , पाण्याची पातळी खालावली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शुद्ध हवा ,पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला आवश्यक असलेले ओक्षिजन(O2 ) ची भासणारी कमतरता या सर्व बाबी याला सर्वस्वी जबाबदार हि आत्ताची पिढी आहे, नक्कीच आपण वैज्ञानिक क्षेत्रात क्रांती केली पण हे करत असताना निसर्गाची दुर्दशा करून टाकली निसर्गाचा समतोल बिघडवनारा मनुष्यप्राणी म्हणजे आपणच जबाबदार आहोत. हि बाब प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे .
प्रशासन तसेच पर्यावरण प्रेमी अगदी सुरुवाती पासून म्हणजे गेली २५ ते ३० वर्षे सांगत आहे , अनेक योजना राबवल्या , संवर्धनासाठी अनेक जंगले ताब्यात घेतली पण , ते त्यांच्या परीने निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करत आहेतच , आपणही एक सामान्य सुज्ञ नागरिक म्हणून आपल्या घरा समोर ,शेतात किंवा जागा मिळेल तिथे एक किंवा एकापेक्षा जास्त झाडे लावुयात व भविष्यात येणाऱ्या अनेक नैसर्गिक संकटाचा सामना करावयास सज्ज होऊयात .... लक्षात ठेवा पृथ्वीतला वर झाडे असतील तर ओक्षिजन आहे , व ओक्षिजन असेल तर हि जीवश्रुष्टी असणार आहे.
अजूनही वेळ गेली नाही .....चला झाडे लावूया झाडे जगवूया .....आणि महाभयानक कोरोनसाराख्या असंख्य रोगांचा सामना करावयास सज्ज होऊया....
सचिन झेंडे, पत्रकार
दैनिक जनमत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा