तर नक्कीच या देशातील बहुजन शासनकर्ती जमात बनेल्.
बहुजन् समाज पार्टी जत विधानसभा व सम्राट अशोक बहुउद्देशीय सामाजिक संस्था जत यांच्या संयुक्त विद्यमाने , स्मृतिशेस् कालकथित महादेव आण्णा कांबळे व स्मृतिशेस् कालकथित अशोक आण्णा कांबळे यांना आदरांजली वहाण्याकरिता घेण्यात आलेल्या या अभिवादन सभेला संबोधित करण्याकरिता मा. प्रा.सुकुमार कांबळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम मा. अतुल दादा कांबळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाला, यावेळी मा . संजय कांबळे साहेब, आर पी आय (आ.)मा.आबासाहेब ऐवळे, मा. लहरीदास कांबळे बसपा सांगली , मा. अविनाश वाघमारे डीपीआय सांगली, मा. भालचंद्र कांबळे बसपा सोलापूर, मा .राजु ऐवळे पत्रकार, आदींनी आदरांजली पर आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनाला आनंद देणारी आणखी एक गोष्ट पाहावयास मिळाली ,ती म्हणजे एकाच व्यासपीठावर आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांचे ,पक्षाचे नेते गण , कार्यकर्ते एकत्र आले , आणी ही गोष्ट माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला भावणारी आहे. हिच एकी जर इथून पुढच्या काळात राजकारणात झाली तर नक्कीच या देशातील बहुजन शासनकर्ती जमात बनेल्.
जय भीम..
सचिन झेंडे, बहुजन समाज पार्टी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा