माणसांन माणसांसोबत माणसासारखं वागलं पाहिजे!....
व्हसपेठ गावातील सर्व प्रिय धम्म बांधवांनो , भीम अनुयायांनो, समाजातील सर्व माता भगिनींनो , वडीलधारी मंडळीनो, राजकीय मंडळीनो आपणा सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय!
आज दि.१५ एप्रिल २०२३, आज मला वैयक्तिक पातळीवर आपण सर्वांना एक निवेदन द्याव , एक आवाहन करावं वाटलं की, *माणसांन माणसांसोबत माणसासारखं वागलं पाहिजे!...*
डिसेंबर २०२२ हे वर्ष आणि हा महिना एक वेगळा अनुभव घेऊन आला. आपलं कोण ,परंक कोण मित्र कोण , शत्रू कोण, प्रामाणिक कोण, गद्दार,लालची कोण फसवे कोण , डबल ढोलकी कोण, तोंडावर गोड बोलणार पण कपटी, तोंडावर वाईट बोलणार पण आपलं भलं व्हावं म्हणून सावध करणारा.. मित्रांमध्ये गद्दार, शत्रू असुनही दिलदार अशी वेगवेगळा स्वभाव असणारी माणसं अगदी जवळून पाहता आली अनुभवता आली, आणि हे शक्य झालं ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं...
माणसातील एखाद्या बद्दल असलेली भावना (चांगली/वाईट) जर जाणुन घ्यायचं असेल तर निवडणूक लढवावी. एकदम स्पष्ट दिसत, दुध का दुध और पाणी का पाणी !
असो.. इलेक्शन झालं काही निवडुन येणारे आले, काही पराभुत झाले, आता पुढे काय?...
झालं थोडे दिवस गावाचं वातावरण तापलेलं साहजिकच आहे, आता जवळपास चार महिने संपत आले काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा जवळपास सगळ काही व्यवस्थित चालू आहे, पण एक गोष्ट मनाला यातना देत आहे
आंबेडकर नगर मध्ये एकमेकांवर असणारा रोष, राग ,चीड, आणि यातुन समोरच्याला त्रास द्यावा या भावनेतून केलेला उपद्व्याप...
सांगताना वाईट वाटत की, एवढी निरर्थक विचारांची माणसं समाजाच नेतृत्व करत आहोत असा आव आणतात आणि समाजातील सर्वच मंडळी, युवक त्यांच्या या षडयंत्राचे बळी पडतात, एकीकडे आख्या गावातील वातावरण पुर्ववत झालेलं असताना, इकडे मात्र या पोरांची जी पुढारी लोकांच्या विचाराचा विरोध करत होती, त्याची जिरवण्याची भाषा केली जाते, समाजातुन बाहेर टाकले आहे, अर्थात वाळीत टाकले आहे असा प्रचार केला जातोय...जे माणुसकीच्या विरोधातील कृत आहे.
*'माणसांन माणसांसोबत माणसासारखं रहावं* ' ....पण इथं कुणीच असं करताना दिसतं नाही... याउलट वातावरण आणखी चिघळल जावं, हा असणारा रोष कैकपटीने वाढावा, समोरच्याला एकटं पाडाव ,त्यांचं माणसिक संतुलन बिघडाव, त्याला एकटेपणाची जाणीव व्हावी, यासाठी जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल याचं नियोजन केले जातं आहे, आणि यामध्ये, ही महान राजकारणी मंडळी जे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे तालुका लेवल ला काम करतात, पैकी काही जण शिक्षक म्हणून लहाना ना संस्काराचे धडे देण्याच , ज्ञानार्जनासारख पवित्र काम करतात , तरीही या असंवैधानिक कृत्यात सामील आहेत, या सर्व मंडळी ने मिळुन एक स्वार्थी डाव खेळला ,यात काही प्रमाणात यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी मिळाल्या नेमकं या अपयशाच भांडवल करून, समाजातील वातावरण दुषित करण्याच पाप तुम्ही मंडळी ने केलं आहे.
आणि महत्वाचं म्हणजे नेमकं आपण समाज म्हणून का त्या लोकांसाठी आपल्याच बाधवां विरोधात हे सारं कारस्थान करत आहात, ज्याना आपल्या बद्दल जराही आपुलकी वाटत नाही, ज्याच्या साठी हा सारा खटाटोप केला आणि करत आहात, ती व्यक्ती विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन पर एखादा फोटो ही सोशल साईट्सवर, अपलोड करत नाही , साधं व्हॉट्स ॲप स्टेटस ठेऊ शकत नाही.अभिवादनपर एखादी ओळ लिहु शकत नाही, त्यांच्यासाठी ....
धन्य झालो...तुमच्या प्रामाणिक पणा वरती..
असो शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहे, निर्णय स्वातंत्र्य आहे, पण झालं सीन बघता कुणीच आपला निर्णय स्वतः घेतला असं म्हणता येणार नाही हे वास्तव आहे.
शेवटी मी एवढं च म्हणेन, जे होतय ते चुकीच होत आहे,जरा यावर आपण सर्वांनी विचार करावा...
मात्र एक सांगतो बांधवांनो हे च वातावरण कायम स्वरुपी असणार नाही, तेंव्हा वैयक्तिक हितसंबंध जोपासता आले तर जोपासावी. आपण सगळे माणसं आहोत, तेंव्हा माणसांसोबत माणसासारखं रहावं..असं विनम्र आवाहन करतो.
धन्यवाद , जय भीम 🙏
सचिन झेंडे
आपण जे काही सध्याच्या वस्तुस्थिती विषयी स्वतःचे मत मांडलात हे कदाचित ,त्या पद्धतीने त्यांच्या वागणुकीतून किंवा स्पष्टपणे दिसून येत असेल. असो, कोणीही अशा पद्धतीने वागणे बरे नव्हे. विशेषतः आपल्या समाजात तरी अस अपेक्षित नाही.
उत्तर द्याहटवापण आपण ज्या काही पद्धतीने आपले विचार मांडलात हे एक मी देखील माणूस म्हणून सांगतो अशा गोष्टीची मला देखील खंत वाटते.
आपलं मला खरंच मनापासून कौतुक करू वाटतंय की आपण ज्या पद्धतीने आपले मत मांडत असताना ज्या शब्दांचा वापर केलाय ते वाचून एक माणूस म्हणून लाज वाटते. कारण आपण माणूस म्हणून वावरताना अशा गोष्टी करायला नाही पाहिजे.
ज्यांचे जसे संस्कार तसे त्यांचे विचार. विशेषतः ( लायकी नुसार) असतात.
असो आपण ज्या पद्धतीने बोलले की माणसाने माणसं सारखे वागले पाहिजे तसे आपण राहूया. शेवटी ज्याच्या त्याच्या विचारानुसार माणूस चालतोच.
Thank you sir, for Your valuable feedback.
हटवा